भारतीय संस्कृतीत गुरुपरंपरेला अनन्यसाधारण महत्वच आहे : डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज

आपल्या भारतीय संस्कृतीत गुरु परंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. मानवाच्या जीवनाला खऱ्या अर्थाने आकार देण्याचे काम गुरूच्या माध्यमातून केले जाते ,असे प्रतिपादन वसुंधरारत्न , शतायुषी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले. लातूर येथे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज सत्संग मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्संग सोहळ्यात ते उपस्थित भाविकांना आशिर्वचन देत होते. या सत्संग सोहळ्याच्या संयोजक सौ. लताताई मुद्दे या होत्या. तर यजमान श्रीमती रेखाताई कार्तिक स्वामी,सौ. निरुपमा कैलास स्वामी,सौ. अश्विनी सताष स्वामी सा. अनुराधा शिवयोगी स्वामी परिवार हे होते. आपल्या मार्गदर्शनात डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज पुढे म्हणाले की , अनेक जन्मानंतर मानव जीवनाची प्राप्ती होत असते. मानव जीवनाचा लाभ होणे हीच एक फार मोठी उपलब्धी आहे. मनुष्य जीवनात संस्कार, कृती, कर्माला फार महत्व असते. अंतः करणातील आत्मा म्हणज जाणाव असते. ही जाणीवच मानवीजीवनात बदल घडवून आणण्याचे काम करते. मनुष्य आणि इतर प्राण्यात अनेक बदल आहेत. अन्य प्राण्यांच्या तुलनेत मानव डा समाजाभिमख नाते संबंधांची जाणीव ठेवून चालत असतो. मानवात विचार, विवेक, जाणीव आढळन येते. या जाणिवेच्या माध्यमातून दैनंदिन कुलसंस्कार होत असतात. म्हणून तर जीवनात संस्काराचे मोल अधिक असते. समाजात वावरतांना काय करावे, काय करू नये याची जाण असणे आवश्यक असते. प्रत्येकाने आपण स्वतःशी तसेच इतरांशी कसे वागतो, वर्तन ठेवतो, याचे आकलन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यावरून आपण जे कांही करतो आहोत ते योग्य आहे.