मुंडेंचे आंदोलन भाजपकडून 'हायजॅक'

'हायजॅक' फडणवीस, दानवे, दरेकर यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे २७ जानेवारीला मराठवाड्याच्या प्रश्र्नांसाठी आंदोलन करणार आहेत. पंकजांचे हे आंदोलन भाजपने पक्षाच्या नावाखाली करण्याचे ठरविले असून, हे आंदोलन भाजप नेत्यांनी 'हायजॅक' केले आहे. औरंगाबादमधील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर होणारया एक दिवसीय उपोषणात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहभागी होणार असल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. १२ डिसेंबर रोजी परळीजवळील गोपीनाथ गडावरील भाषणात पंकजा यांनी औरंगाबादमधल्या उपोषणाची घोषणा केली होती. मराठवाडयाच्या पाणी व सिंचनाच्या प्रश्र्नांवर हे उपोषण असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्या सभेत त्यांचा रोख आणि राग हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता, असे मानले जाते. मात्र, आता फडणवीस यांच्यासह इतर नेते उपोषणात सहभागी होणार आहेत. २०१३ मध्ये औरंगाबादेत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी तत्कालीन राज्य सरकारविरुद्ध केलेल्या उपोषणाचा कित्ता पंकजा गिरवणार होत्या. मात्र पंकजा यांनी स्वतंत्र उपोषण केले असते तर पक्षातील दुहीचा संदेश मराठवाडयात गेला असता आणि त्यामुळे भविष्यात पक्षाच्या अडचणीत वाढच झाली असती, असे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. ३ हजार कार्यकर्ते होणार सहभागी पक्षाने पोलीस आणि विभागीय आयुक्त कार्यालयात परवानगी अर्ज सादर केले आहेत. या उपोषणात किमान अडीच ते तीन हजार कार्यकर्ते सहभागी होतील, असे नियोजन करण्यात येत आहे. उपोषण आता गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे नसल्याने भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यात सहभागी होणार आहेत.


Popular posts
*खैर फाउंडेशन तर्फे आवाहन* -------------------- उस्मानाबाद शहरातील नागरिकांना आवाहन की आपल्या घरा शेजारी कींवा ओळखीत असे कुटुंब असतील ज्यांना अन्नधान्य पुरविण्याची गरज आहे, कृपया अश्या कुटुंबीची माहिती आम्हला वाट्सअप द्वारे कळवा, जेणेकरून आम्ही त्या गरजवंतांना अन्नधान्य घरपोच करू🙏🏼 जहीर मोमोन: 9422120101 सय्यद हारीस: 9049723888
सोशल डिस्टन्सिंग
कराड नगरपालिकेतर्फे मानांकनाचे वितरण
👆👇कर्फ्यु चे पालन न केल्यामुळे वाशी पोलिस स्टेशन 40 जणांना अटक , 8 दिवस पोलिस कस्टडी, जामीन नाही विनाकारण बाहेर पडु नका🙏🙏🙏
Image
स्वतःचे, समाजाचे भक्षक होऊ नका !